NCP Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'मविआ'च्या उद्याच्या सभेला अजित पवार जाणार नाहीत? काय म्हणतायत इतर पक्षांचे नेते?

संतोष कानडे

मुंबईः महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा उद्या नागपूर येथे होत आहे. या सभेला ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र अजित पवारांच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे नुकतीच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरे यांना वेगळं आसन देण्यात आलेलं होतं. शिवाय सभा सुरु झाल्यानंतर त्यांची सभास्थळी उपस्थिती झाली होती. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दांडी मारली होती. त्यानंतर दुसरी सभा आता नागपूर येते होत आहे.

नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित राहणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 'टीव्ही ९ मराठी'ने यासंदर्भातील वृत्त दिले असून त्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहतील, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. दर संजय राऊत यांनीदेखील ते उपस्थित राहतील, अशी प्रतिक्रिया दिलीय. दुसरीकडे अजित पवारांऐवजी अनिल देशमुख हे नागपूरच्या सभेला उपस्थित राहतील, असं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे नेते नागपूच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. जयंत पाटील हेदेखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात असतांना अजित पवारांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण केली जातेय. मागच्या तीन-चार दिवसांपासून अजित पवांरांचं मौन असल्यानं ते जातील की नाही? याबाबत कुणीहीह ठामपणे काहीही सांगत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT