Ajit Pawar PM Meet Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar PM Meet: राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांची दुसऱ्यांदा दिल्ली वारी, पहिल्यांदाच घेणार PM मोदींची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अजित पवार यांच्यासह इतर ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. अजित पवार 18 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याची माहीती खुद्द अजित पवार यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

''मी 18 जुलैला पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहे. या बैठकीमध्ये मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Marathi Tajya Batmya)

दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या 18 जुलैच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकींवर चर्चा करण्यात येणार आहे. अजित पवारांचा हा दुसरा दिल्ली दौरा असणार आहे. यापूर्वी खातेवाटपाआधी अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली होती.(Latest Marathi News)

दरम्यान अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुकही केलं आहे. बोलताना ते म्हणाले की, 'देशातच नव्हे तर जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. सरकारमध्ये असल्याशिवाय राज्यातील प्रश्न सोडवणे शक्य होणार नसल्याचे सांगत पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही असंही ते म्हणालेत'. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT