Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिवसेना खासदारांच्या मतदारसंघावर अजितदादांचा डोळा? आगामी लोकसभेसाठी मोठी खेळी

अजित पवार गटाकडून आगामी लोकसभेसाठी मतदारसंघात पक्षवाढीसाठी दौरे करण्यात येणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, अजित पवार गटाकडून राज्याचा दौरा करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदार संघांमध्येही राष्ट्रवादीचे मंत्री, नेते दौरे करणार असल्याने ठरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

काल (शुक्रवारी) मुंबईतील मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षाचे नेते तसेच मंत्री सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्ष वाढीसाठी दौरे करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, अजित पवार गटाकडून ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी दौरे करण्यात येणार आहे, त्यामध्ये शिंदे गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी भाजपने काही महिन्यांआधीच शिंदेंचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले आहेत.

दरम्यान, अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे राजकीय नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर महायुतीमध्ये अजित पवार यांच्या येण्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर काही नेत्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.

आता अजित पवार यांनी शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघात पक्षवाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने शिंदे गटातील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT