हरिभाऊ बागडे, अजित पवार 
महाराष्ट्र बातम्या

दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी बागडेंना केला होता फोन

प्रकाश बनकर

औरंगाबाद -  "दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी मला फोन करून विचारले, नाना कुठे आहात? मी औरंगाबादला आहे, असे सांगितले. तेव्हा कळाले नाही की ते राजीनामा देणार होते. आज अचानक मुंबईच्या विधिमंडळातील माझ्या कार्यालयात ते आले. माझे पीए सागर यांच्याकडे स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला राजीनामा सादर केला आणि तेथूनच मला फोन करून राजीनामा दिल्याचे सांगितले, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी "सकाळ'ला दिली. 

श्री. बागडे म्हणाले, "अजित पवार माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मी त्यांना मैत्रीच्या भाषेतच का राजीनामा दिला हे विचारले. तेव्हा नाना नंतर सांगतो, असे सांगून माझा राजीनामा तत्काळ मंजूर करा एवढेच त्यांनी सांगितले. माझ्या मुंबईच्या कार्यालयात सायंकाळी 5.40 वाजता पवारांनी हा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही तो मंजूर केला,'' अशी माहिती बागडे यांनी दिली. शिवाय "मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करण्यात यावा', एवढाच मजकूर राजीनामापत्रात असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
मेलवर राजीनामा स्वीकारण्याची सुविधा 
आतापर्यंत अनेकांचे राजीनामे स्वीकारणारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आठवडाभरापूर्वी राजीनामा देण्यासाठी मला भेटण्याची गरज नाही. माझ्या मेलवर राजीनामा दिल्यास तो मंजूर केला जाईल. तशी सुविधा केली असल्याचे "सकाळ'ला सांगितले होते. त्यानुसार मेलवर आतापर्यंत तीन आमदारांनी राजीनामे पाठविले आहेत. ते मंजूर केले आहेत, असेही बागडे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन ;पालिका वॉर्ड कार्यालयातील नागरिकांच्या फेऱ्या टळणार

तेजश्री प्रधानचा नजरेत भरणारा लूक! फ्रील साडी अन् खुललेलं रुप पाहून चाहते घायाळ, Viral Video

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

SCROLL FOR NEXT