Jitendra Awhad-Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : अजित पवारांची पत्रकार परिषद म्हणजे 'किटी पार्टी' तू जिंकली, ही जिंकली; आव्हाडांची खोचक टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अजित पवार आणि प्रमुख नेते राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजप-शिंदे सरकारला सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले असून एकमेकांवरील कारवाईचे सत्र सुरू झाले आहे.

अजित पवार गटाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रतोदपदावरून जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी केली. त्यावरून आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली असून आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाने केलेल्या नियुक्त्या आणि पदमुक्ततेचे निर्णय अवैध असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी अनेक कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला.

जयंत पाटील यांनाच नियुक्त्या करण्याचा आणि कारवाई करण्याचे अधिकार आहेत. कायद्याच्या अज्ञानापोटी त्यांनी केलेल्या नियुक्तीला अर्थ नाही. तसेच तुम्ही म्हणता शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजित दादांसह सर्वांनी हे मान्य केल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.

आताच राष्ट्रवादी पक्ष म्हणून काही जणांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत विविध पद वाटण्यात आली. अजित पवार गटाने घेतलेली पत्रकार परिषद ही निव्वळ किटी पार्टी होती. तू जिंकली, ही जिंकली, मीही जिंकले, असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार गटाची खिल्ली उडवली.

एकंदरीतीच आव्हाड यांनी केलेल्या टीकेमुळे अजित पवार गट आणि शिंदे गटातील वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टीकेला अजित पवार गटाकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT