Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अनेक वर्षे पुण्याचा पालकमंत्री होतो, आजवर पुण्यात झेंडावंदन..', अजित पवारांची ध्वजारोहणाबद्दल पहिली प्रतिक्रिया

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणावरुन राजकारण सुरु आहे, पुण्यातील ध्वजारोहण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणावरुन सध्या राजकारण सुरु आहे. पुण्यातील ध्वजारोहण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे पुण्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ध्वजारोहणाची यादी जाहीर झाली आणि ध्वजारोहणाचा तिढा सुटला होता. मात्र याच यादीवर हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि अजित पवारांनी नाराज व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुण्यात रमेश बैस ध्वजारोहण करतील, असं सांगण्यात आलं आहे.

त्यावर अजित पवारांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांपैकी कुणालाही नाराज करू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं अजित पवार यांनी खंडन केलं आहे. मी अनेक वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्याकडे अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही 15 ऑगस्टचं झेंडा वंदन पालकमंत्री करत नाहीत', असं अजित पवार म्हणाले आहेत.

'1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीला पुण्यात मी ध्वजारोहण केलं. गिरीश बापटांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनीही केलं. पण तुम्ही लगेच उलट्या बातम्या चालवल्या. क्षुल्लक कारणांचा बाऊ केला. तुम्ही माहिती घ्या, असंही अजित पवार पुढे म्हणाले आहेत.

तर पुढे ते म्हणाले की, 'वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ती जाणून घ्या. कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. वेगवेळ्या मंत्र्यांना झेंडा वंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. माहिती घ्यायची नाही, रुसवे, फुगवे सांगतात. कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा? कुणी तुम्हाला रुसून सांगितलं. कुणी फुगून सांगितलं. चुकीच्या बातम्या देऊ नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT