Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: अजितदादा कर्तृत्वान नेते! पक्षाने त्यांना योग्य संधी द्यावी; भाजप नेत्याचा शरद पवारांना सल्ला

टिफिन बैठकीदरम्यान संवाद

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ: विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना शरद पवार यांनीच योग्य संधी द्यावी, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ते तालुक्यातील चाणी कामठवाडा येथील भाजपच्या टिफिन बैठकीत गुरुवारी (ता. २२) पत्रकारांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रांतील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून कार्यकर्ते मेळावे आयोजित करून गेल्या नऊ वर्षातील विकासकामांची माहिती देण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून चाणी कामठवाडा येथे बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी टिफिन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मदन येरावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

मुंबई महापालिकेच्या घोटाळ्यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, मुंबई पालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाच्या स्ट्रीट आणि फर्निचरसंदर्भांत जी उभारणी केली, तसेच त्यासंदर्भात जो घोटाळा झाला त्याची चौकशी झालीच पाहिजे.

कुठल्याही तक्रारीची चौकशी व्हायला पाहिजे, मग आदित्य ठाकरे असो वा इतर कोणीही असो. ज्याने कोणी चौकशीसंदर्भात मागणी केली त्यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. १२, १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार मागच्या महानगर पालिकेच्या काळात झाला.

पुढे बावनकुळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या दर्शनाला गेले हे उद्धव ठाकरेंना मान्य असेल तर त्यांनी युती कायम ठेवावी. त्यांनी ते जाहीर तरी करावे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत.

त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल का, या प्रश्‍नाला उत्तर देताना बावनकुळे यांनी सांगितले की, पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचे दर्शनासाठी कुणीही येऊ शकते. परंतु, बिआरएसचे मॉडेल हे फेल झाले असून ते आम्ही घरोघरी पोहोचविणार आहोत.

’भाजपचा बुथ पातळीवरील कार्यकर्ता पक्षासाठी राबत असतो. त्याला बळ देणे व त्याचा आत्मविश्‍वास वाढविणे यासाठी ही कौटुंबिक टिफिन बैठक आहे. अशा बैठका महाराष्ट्रातील २८८ विधानसभांमध्ये होत आहेत.’

-चंद्रशेखर बावनकुळे,

प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT