ग्रंथदिंडी
ग्रंथदिंडी sakal
महाराष्ट्र

उदगीरमध्ये साहित्याची मांदियाळी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

उदगीर (जि.लातूर) : ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज, भारतीय संविधान ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराज आदी प्रभूतींच्या नामजयघोषात शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सकाळी सुरूवात झाली. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांचा सोहळा आजपासून सुरू झाला. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Udgir)

संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, ना. संजय बनसोडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तूरकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिंडीची सुरुवात ग्रंथपूजनाने झाली.

दिंडीत महाराणी जीजामाता, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषेत अनुक्रमे गीतांजली रेड्डी, प्रेरणा रेड्डी आणि संस्कार रेड्डी हे अश्वारूढ होते. डोईवर कलश, तुळस घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील महिलादेखील दिंडीच्या रंगसंगतीत भर घालत होत्या. रंगीत फेटेधारी पुरूषांसह महिलांचा सहभाग, नवरसांची संकल्पना घेऊन नऊ रंगांच्या टोप्याधारी विद्यार्थी, विठूनामाच्या गजरात टाळ मृदंगासह नृत्य करणारी बालगोपाळ मंडळी, महाराष्ट्राच्या मैदानी खेळांतील शारीरिक कवायतींचे प्रदर्शन करणारे सैनिकी शाळेचे विद्यार्थी, जय हिंद स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक गुगळ नृत्य, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक असे देखणे चित्र उदगीरच्या पथकावर पहायला मिळाले तर मोराचा चित्ताकर्षक चित्ररथ लक्षवेधक ठरला.

ग्रंथदिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांची वाहनधारी रॅली. यात 11 बुलेटधारी महिला तसेच स्कूटीवरील 120 महिला आणि 120 पुरूष सायकलींसह सहभागी होते. मराठवाड्याचा सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक इतिहास दर्शविणारे विविध संदेशात्मक चित्ररथ ग्रंथदिंडीत होते. याशिवाय ढोल, लेझीमसह वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे 150 कलावंतही ग्रंथदिंडी सहभागी होते.

ठिकठिकाणी माय मराठीचा जल्लोष, फुलांच्या रांगोळ्या, रंगांच्या पायघड्यांनी संभेलनस्थळाकडे जाणारा मार्ग सुशोभित करण्यात आला होता. पारंपरिक वेशभूषेतील स्त्री-पुरूषांसह दिंडीत सहभागी समस्त मान्यवर आणि साहित्यप्रेमी शिरावर मानाचा फेटा मिरवताना आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT