Death Body Sakal
महाराष्ट्र बातम्या

यमराजाच्या मनात आलं अन् परत पाठवलं; चक्क तिरडीवरच उठून बसला 'मृत तरूण'

दत्ता लवांडे

अकोला : अकोल्या जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात एक धक्कादायक प्रकार घडला असून डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तरूण चक्क उठून बसला आहे. प्रशांत मेशरे असं या तरूणाचं नाव असून त्याला बुधवारी डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली गेली अन् अंत्यसंस्कारासाठी नेत असताना हा तरूण तिरडीवरच उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अधिक माहितीनुसार, प्रशांत मेशरे हा तरूण मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. या तरूणाच्या अंगात देव येत असल्याच्या चर्चाही गावात सुरू आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये दैवी शक्ती असल्याचाही आरोप केला जातोय. तर काल या तरूणाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली होती.

संध्याकाळी सातच्या दरम्यान मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तिरडी हलू लागल्याने मृतदेह खाली ठेवण्यात आला आणि तरूण जिवंत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिरडी मंदिरात आणली गेली. त्यानंतर प्रशांत तिरडीवरच उठून बसला. त्याला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी जमा झाली. त्याच्याकडे दैवी शक्ती असल्यामुळे तो मृत झाल्यानंतरही उठून बसल्याच्या चर्चा गावात सुरू झाल्या आहेत. तर यमराजाच्या मनात आलं अन् परत पाठवलं असाच काहीसा प्रकार घडला आहे.

दरम्यान, प्रशांत होमगार्डमध्ये कामाला असून तो मंत्रतंत्राच्या गोष्टी करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तर या घटनेनंतर प्रशांतला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं असून प्रशांत आणि त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर अधिकचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT