महाराष्ट्र बातम्या

‘एक मराठा, लाख मराठा’चा जयघोष; मराठा बांधवांचा जल्लोष! लढ्याला यश, मराठा बांधवांनी फटाके फोडून साजरा केला आनंद

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयऱ्यांच्या शपथपत्राचा आधार घेण्याचा निर्णय घेत राज्यसरकारने अधिसूचना जारी केली.

सकाळ डिजिटल टीम

Akola Maratha Reservation Celebration: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयऱ्यांच्या शपथपत्राचा आधार घेण्याचा निर्णय घेत राज्यसरकारने अधिसूचना जारी केली. त्यामुळे मुंबईला मोर्चा घेऊन निघालेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर शनिवारी (ता. २७) दुपारी स्थानिक सिव्हिल लाईन चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे पाटील जिंदाबाद अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

राज्यातील सकल मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारी रोजी मुंबईला मोर्चा घेऊन निघाला. मोर्चा २६ जानेवारी रोजी हा मुंबईजवळील वाशी येथे होता. लाखोंच्या संख्येने असलेला मराठा समाज मुंबईत आला तर अनेक समस्या निर्माण होतील, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या शिष्टमंडळांनी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू केली होती.

तेव्हा जरांगे पाटील यांनी शनिवारी (ता. २७) १२ वाजेपर्यंत निर्णय न घेतल्यास मुंबईला जाण्याचा इशारा दिला होता. दरम्यान रात्रीतून हालचाली झाल्या. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकांनंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेत अधिसूचना जारी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकारी मंत्र्यांसोबत सकाळी वाशी येथे जाऊन जरांगेंना भेटले. तेथे त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले आणि जरांगे यांचे उपोषण सोडले. त्यामुळे उत्साहित व आनंदीत झालेल्या मराठा बांधवांनी शनिवारी (ता. २७) जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला.

मागण्या मान्य झाल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारी सिव्हील लाईन चौकात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यासोबतच फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटून आनंद द्विगुणीत करण्यात आला. (Latest Marathi News)

यावेळी मराठा समाजाचे कृष्णा अंधारे, संदीप पाटील, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, पंकज साबळे यांच्यासह पुरूष व महिला मराठा आंदोलकांची मोठ्‍या प्रमाणात उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठा मरासंघाच्या युवा आघाडीच्या वतीने सुद्धा छत्रपती श्री शिवाजी पार्क येथे जल्लोष साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT