Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा! उजनी धरणातून भीमा नदीतील विसर्ग वाढविला; दौंडवरून उजनीत ११ हजार क्युसेकचा विसर्ग

उजनी धरणात सध्या दौंडवरून ११ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे. धरण सध्या ९५ टक्के भरल्याने पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो १५ हजार क्युसेक करण्यात आला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणात सध्या दौंडवरून ११ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे. धरण सध्या ९५ टक्के भरल्याने पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो १५ हजार क्युसेक करण्यात आला आहे.

उजनी धरण १०० टक्के भरण्यासाठी पाच टक्के शिल्लक आहेत. दौंड व धरण परिसरातील विसर्ग नियमित सुरू असल्याने उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी भीमा नदीत सोडलेला विसर्ग १० हजारावरून १५ हजार केला आहे. गुरूवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजता पाच हजाराचा विसर्ग वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या धरणातून कालव्याद्वारे २१०० क्युसेक, बोगद्यातून ४०० क्युसेक, दहिगाव व सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २६० क्युसेक आणि धरणाजवळील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीत सोडलेला उजनी धरणाचा विसर्ग आगामी काळात वाढू शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणी

  • ११४.५३ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ९४.९५ टक्के

  • भीमा नदीत सोडलेला विसर्ग

  • १५,००० क्युसेक

  • दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग

  • ११,४०० क्युसेक

  • विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी पाणी

  • १६०० क्युसेक

  • कालव्यातून सोडलेला विसर्ग

  • २१०० क्युसेक

  • बोगद्यातून सोडलेले पाणी

  • ४०० क्युसेक

  • सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून सोडलेले पाणी

  • २६० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT