All MLA Shinde group go to the airport to receive CM Eknath Shinde disqualification case win 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री शिंदेंना रिसिव्ह करण्यासाठी सर्व आमदार मुंबई विमानतळावर! जंगी स्वागताची तयारी, शिवसैनिकांचा जल्लोष

All MLA Shinde group go to the airport to receive CM Eknath Shinde : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये उत्साह आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये उत्साह आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिसिव्ह करण्यासाठी शिंदे गटाचे सगळे नेते विमानतळावर जाणार असल्याची माहिती आहे. (All MLA Shinde group go to the airport to receive CM Eknath Shinde disqualification case win)

सर्व आमदार, नेते आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना रिसिव्ह करण्यासाठी विमानतळावर जातील. एकनाथ शिंदे शिवसंकल्प यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोली येथेही त्यांची आज सभा झाली. कार्यक्रम आटोपून ते आज रात्री १२ च्या सुमारात मुंबई विमानतळावर येणार आहेत. त्यानिमित्त सर्व आमदार त्यांना घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्यासोबत जल्लोष करणार आहेत.

मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबई विमानतळावर जमा झाले आहेत. त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नृत्य करत कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. १२ वाजण्याच्या सुमारास शिंदेंचे विमान विमानतळावर उतरेल. यावेळी त्यांची जंगी स्वागत करण्यात येणार आहे. आजचा दिवस हा शिंदेच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT