पोलिस sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षेसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

सुरक्षेसाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर असणार कडेकोट बंदोबस्त

निनाद कुलकर्णी

मुंबई : नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्चचर यंत्रणांना मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या उद्या (31 डिसेंबर ) साप्ताहिक आणि सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. (All Police Holidays & Weekly Holidays Have Been Cancelled Tomorrow)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मुंबईवर उद्या हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या उद्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख स्थानकं जसे दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उद्या 3000 हून अधिक रेल्वे अधिकारी तैनात केले जातील, अशी माहिती मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी दिली आहे. (Quaiser Khalid, Commissioner of Police, Mumbai Railway)

कलम 144 लागू

दरम्यान, मुंबईत पुन्हा कोरोनाच्या (Corona Cases Hike In Mumba ) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत (Act 144 Imposed In Mumbai Till 7th Jan 2022) 7 जानेवारीपर्यंत कलम 144 जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मोठ्या पार्ट्यांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यात गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीमुळे शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. (Corona Cases In Maharashtra)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईतील कोंडी कायमची फुटणार! 'या' भागात नवा उड्डाणपूल उभारणार; वाचा सविस्तर

Agriculture News : द्राक्ष उत्पादनाचे नुकसान कागद उद्योगालाही भोवले! मागणीत तब्बल ७० टक्के घट, २१ कोटींवर फिरले पाणी

Latest Marathi Breaking News : मनमाडमध्ये सराफा बाजार बंद; लहान मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

Jaysingpur Politics: निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमिगत नेते पुढे; सोशल मीडियावर चमक, गल्ल्याबोळात अचानक वावर वाढला!

Panchavati Election : पंचवटी भाजपचा हक्काचा प्रभाग, पण मतदारांचा अपेक्षाभंग! महापौर, सभापती पदे मिळूनही पाणी, उद्यानांचा प्रश्न कायम

SCROLL FOR NEXT