Cabinet Expansion Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटप रखडलं, पण बंगले, दालनांचं झालं वाटप; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली निवासस्थानं

राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

NCP Ajit Pawar Latest News : राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे खातेवाटप रखडले असले तरी मंत्र्यांना काल (मंगळवारी) बंगले आणि दालनांचे मात्र वाटप करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला कायम आहे. तर अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिळालेला ए ५ बंगला आता राष्ट्रवादी भवन झाल्यामुळं त्यांना आता कोणता बंगला मिळणार याबाबत प्रतीक्षा आहे.(Latest Marathi News)

छगन भुजबळांना ब-६ सिद्धगड हे सरकारी निवासस्थानं मिळालं आहे तर २०१ क्रमांकाचे दालन मिळाले आहे.

हसन मुश्रीफांना क-८ विशाळगड हे सरकारी निवासस्थानं मिळालं आहे तर ४०७ क्रमांकाचे दालन मिळाले आहे.

दिलीप वळसे पाटील क-१ सुवर्णगड हे सरकारी निवासस्थानं मिळालं आहे तर ३०३ क्रमांकाचे दालन मिळाले आहे.

धनंजय मुंडे क-६ प्रचितगड हे सरकारी निवासस्थानं मिळालं आहे तर २०१ ते २०४ आणि २१२ क्रमांकाचे दालन मिळाले आहे.

धर्मरावबाबा अत्राम सुरुचि -३ हे सरकारी निवासस्थानं मिळालं आहे तर ६०१, ६०२ आणि ६०४ क्रमांकाचे दालन मिळाले आहे. अनिल पाटील सुरुचि - ८ हे सरकारी निवासस्थानं मिळालं आहे तर ४०१ क्रमांकाचे दालन मिळाले आहे. संजय बनसोडे सुरुचि - १ हे सरकारी निवासस्थानं मिळालं आहे तर ३०१ क्रमांकाचे दालन मिळाले आहे. अदिती तटकरे १०३ क्रमांकाचे दालन मिळाले आहे. अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिळालेला ए ५ बंगला आता राष्ट्रवादी भवन झाल्यामुळं त्यांना आता कोणता बंगला मिळणार याबाबत प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: 'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT