Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार, अजित पवार गटातील नेत्याचे शरद पवारांना उत्तर

Sandip Kapde

Sharad Pawar News

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गट आक्रमक झाला आहे. शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार गटात गेलेले अमरसिंह पंडित यांच्यावर टीका केली.

वयावरुन भूमिका घेणाऱ्या अमरसिंह पंडित यांच्यावर पवारांनी हल्लाबोल केला. तसेच ज्यांच्यामुळं तुमचं भलं झालं त्यांची थोडी तरी जाणीव ठेवा अशा शब्दांत त्यांनी सुनावलं होतं. यालाच आता अमरसिंह पंडित यांनी उत्तर दिलं आहे.

अमरसिंह पंडित म्हणाले, "काल, आज आणि भविष्यातही तुमच्याबद्दल (शरद पवार) श्रध्दा आणि आदर कायम राहील. बीड येथील सभेत आपण माझ्या तोंडी घातलेल्या वाक्याबाबत मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही. आपल्या कानी कोणी काय घातले हे मला माहित नाही, त्याविषयी जाणून घेण्यात स्वारस्यही नाही मात्र हे अत्यंत क्लेषदायक आहे, एवढेच सांगतो." (latest marathi news)

"आम्हा भावंडांवर शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, त्यामुळे केवळ तुमचे वय झाले म्हणून नेतृत्व बदल केला असे तोडके विचार आमच्या मनी येणार नाहीत. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी सोडा परंतु वैयक्तिक सुध्दा कोणाला बोललेलो नाही. तुम्हाला शंभर वर्षे निरामय आयुष्य लाभो हीच सदैव भवानी चरणी प्रार्थना आहे. "

"तुमच्या सोबत अनेक वर्षे निष्ठेने काम करताना अनेक संधी आणि प्रलोभने मिळाली मात्र त्यावेळी कधीही डगमगलो नाही, तुमची साथ सोडली नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून पवार परिवाराशी शिवछत्र परिवाराचा स्नेहबंध, तो भविष्यातही जपणार आहे," असे अमरसिंह पंडित म्हणाले.

"तुम्ही आणि अजितदादा वेगळे व्हावेत हेच मुळात पटत नाही... असो, राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक लाभाचा विचार कधीच मनाला शिवला नाही, लाभापायी काही निर्णय घेणार नाही याची खात्री तर तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत", असे अमरसिंह पंडित शरद पवारांना म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार म्हणाले, "जिल्ह्याच्या नेत्यांना काय झालंय माहिती नाही. एका नेत्यांन सांगितलं कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. आम्ही चौकशी केली की काय झालं? आजपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण असं कळलं की त्यांना अमरसिंह पंडितांनी काहीतरी सांगितलं. काय सांगितलं तर पवार साहेबांचं आता वय झालंय, त्यामुळं आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. पण माझं त्यांना एवढचं सांगण आहे माझं वय झालंय असं तुम्ही म्हणता पण तुम्ही माझं काम बघितलं आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT