sukanya samriddhi yojana sakal
महाराष्ट्र बातम्या

१० वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी भन्नाट योजना! १५ वर्षांनंतर मिळते दुप्पट रक्कम; आजच उघडा खाते, मिटेल भविष्याची चिंता; कोठे करायचा अर्ज, काय लागतात कागदपत्रे?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे, ज्यातून तिचे वय समजते. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा इतर कोणतेही सरकार-कागदपत्र पालक किंवा पालकांचा पुरावा म्हणून जोडावा लागतो. केवळ या दोन कागदपत्रांवरच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते.

तात्या लांडगे

सोलापूर : मुलींच्या भविष्याची चिंता (शिक्षण, विवाह) दूर व्हावी, ती कुटुंबासाठी ओझे वाटू नये, तिच्या शिक्षण व विवाहाचा सहजपणे खर्च करता यावा, भ्रूणहत्या रोखल्या जाव्यात म्हणून २२ जानेवारी २०१५ रोजी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. त्याअंतर्गत सोलापूर शहर-जिल्ह्यातील दीड लाख पालकांनी आपल्या मुलींची खाती उघडून भविष्याचा भार हलका केला आहे. त्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत मोहोळ, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, सोलापूर शहर येथील मुलींची खाती सर्वाधिक आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दरवर्षी किमान २५० रुपये तर कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर खाते बंद करून त्यातील रक्कम काढता येते, पण २१ वर्षांनंतर योजनेअंतर्गत मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट किंवा त्याहून जास्त रक्कम मिळते. अधिकृत व्यावसायिक बँक किंवा इंडिया पोस्ट शाखेत बचत खाते उघडून त्यात दरमहा पैसे जमा करता येतात. त्या रकमेवर ८.२ टक्के व्याज दर मिळतो.

या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती १० वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावाने खाते उघडता येते. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एकूण जमा रकमेतून ५० टक्के रक्कम आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तसेच तिचे लग्न झाल्यास पूर्ण रक्कम काढता येऊ शकते. खाते उघडून किमान पाच वर्षे झाल्याशिवाय खाते बंद करता येत नाही, अशा योजनेच्या अटी आहेत.

खाते उघडण्यासाठी लागतात ‘ही’ कागदपत्रे

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे, ज्यातून तिचे वय समजते. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा इतर कोणतेही सरकार-कागदपत्र पालक किंवा पालकांचा पुरावा म्हणून जोडावा लागतो. केवळ या दोन कागदपत्रांवरच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते. त्यात दरमहा शक्य तेवढी रक्कम (वार्षिक दीड लाख मर्यादा) ठेवता येते.

लेक लाडकीमुळे ‘सुकन्या’कडे पाठ

राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ रोजी राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांच्या मुलींसाठी (दोन मुली) लेकी लाडकी योजना सुरू केली. त्याअंतर्गत अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करून दिल्यावर जिल्हा प्रशासनाकडून दोन महिन्यात कार्यवाही होते. मुलगी जन्मल्यावर ५००० रुपये तर पहिलीत गेल्यावर ६०००, सातवीत गेल्यावर ७००० आणि आठवीत गेल्यावर ८००० रुपये तिच्या खात्यात सरकार जमा करते. १८ वर्षांची मुलगी झाल्यावर एकूण ७५ हजार रुपये तिला मिळतात. एकूण पाच टप्प्यात तिला सरकारकडून एक लाख रुपये दिले जातात. या योजनेमुळे अनेकांनी सुकन्या समृद्धी योजनेकडे पाठ फिरविल्याची सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 India vs UAE : भारत विरुद्ध यूएई सामना लाईव्ह कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ अन् सर्व काही...

हैद्राबाद गॅझेटिअरनुसार 8 जिल्ह्यांत कुणबी नोंदींची पडताळणी; 'इतकी' कुणबी प्रमाणपत्रे ठरली वैध, हजारो अर्जांची तपासणी सुरूच

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

Solapur Tourist Places: सोलापूरमध्ये फिरायला जायचंय? मग पावसाळ्यात हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा चीझ मशरूम सँडवीच, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT