MKCL has made changes in MS-CIT curriculum 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मुलींसाठी भन्नाट योजना! सातवी उत्तीर्ण गावकडच्या मुलींना करता येणार एमएस-सीआयटी, टॅलीचा कोर्स मोफत; दीड लाखांच्या वार्षिक उत्पन्नाची अट, वाचा...

इयत्ता सातवी उत्तीर्ण मुलींना या योजनेसाठी अर्ज करता येतो. सध्या दहावीतील विद्यार्थिनींची संख्या अधिक असते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलींना शासकीय नोकरभरती किंवा खासगी आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा योजनेचा हेतू आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागातील मुलींसाठी जिल्हा परिषदेने एमएस-सीआयटी व टॅलीचे प्रशिक्षण मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. २०२६-२७ या वर्षात चार हजार मुलींना संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असलेल्या मुलींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.

इयत्ता सातवी उत्तीर्ण मुलींना या योजनेसाठी अर्ज करता येतो. सध्या दहावीतील विद्यार्थिनींची संख्या अधिक असते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलींना शासकीय नोकरभरती किंवा खासगी आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा योजनेचा हेतू आहे. गावातील किंवा जवळील संगणक प्रशिक्षण केंद्रांवर त्यांना दररोज एमएस-सीआयटी व टॅलीचे प्रशिक्षण दिले जाईल. यंदा जून-जुलैमध्ये अर्ज स्वीकारले जातील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षणास सुरुवात होऊन जानेवारीअखेर ते पूर्ण होईल. या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जून-जुलैपासून अर्ज स्वीकारले जातात

अनुसूचित जातींसह सर्व प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना दरवर्षी एमएस-सीआयटी व टॅलीचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. इयत्ता सातवी उत्तीर्ण मुलींनाही या योजनेचा लाभ घेता येतो. लाभार्थी निवडीसाठी स्वतंत्र समिती असून, दरवर्षी सुमारे चार हजार मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यासाठी एजन्सी नेमली जाते आणि त्यांच्या माध्यमातून ‘एमकेसीएल’च्या केंद्रांवर परीक्षा घेतली जाते.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

पंचायत समितीत करता येतो अर्ज

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत ही मोफत संगणक प्रशिक्षण योजना राबविली जाते. यासाठी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे व ती ग्रामीण भागातील रहिवासी असावी, असे निकष आहेत. पात्र मुलींनी पंचायत समितीतील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा. त्यानंतर समितीमार्फत अर्जांची छाननी करून प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT