kolhapur sakal
महाराष्ट्र बातम्या

तासाला 1200 भाविकांनाच प्रवेश; कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनात बदल

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कर्नाटकात (Karnatka)ओमायक्रॉनचा (Omicron) दोन रूग्ण सापडल्यानंतर महाराष्ट्रातही सरकार आणि यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील (Ambabai Temple)दर्शनाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाविकांना आता तासाला 1500 ऐवजी केवळ 1200 जणांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. याच बरोबर कोरोना संसर्ग वाढल्यास 700 भाविकांनाच दर्शनासाठी पास दिले जातील, अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. मंदिरा समोर भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहनही देवस्थान समितीककडून करण्यात आले आहे.

घटस्थापनेपासून राज्यभरातली मंदिरे पुन्हा सुरु झाली. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होती. मात्र सरकारनं हे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

आता प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेत चार ते पाच ठिकाणी सॅनिटायझर मारण्यात येऊन त्याचे तापमान तपासण्यात येत आहे . प्रत्येक भाविकाला मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नसून हजारोंच्या संख्येने भाविक असूनही सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. सध्या दर दोन तासांनी मंदिराची सफाई केली जात असून मंदिर प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT