Ambadas Danve sakal
महाराष्ट्र बातम्या

Ambadas Danve : विधान परिषदेत ‘बोरीचा बार’;अंबादास दानवे-प्रसाद लाड यांच्यात शिवीगाळ,कामकाज तहकूब

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे निमित्त होऊन विधान परिषदेतील गदारोळाचे पर्यावसान थेट शिवीगाळीत झाले. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी सभागृहात ‘बोरीचा बार’ भरविल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधान परिषदेच्या इतिहासात पाहावयास मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे निमित्त होऊन विधान परिषदेतील गदारोळाचे पर्यावसान थेट शिवीगाळीत झाले. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी सभागृहात ‘बोरीचा बार’ भरविल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधान परिषदेच्या इतिहासात पाहावयास मिळाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यातील शिवीगाळ आणि हमरी-तुमरीनंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. दानवे यांचे सदस्यत्व रद्द करेपर्यंत सभागृहाचे कामकाज न चालू देण्याचा इशारा सत्ताधाऱ्यांनी दिला. आपल्याकडे बोट दाखवणाऱ्याचे बोट कापून टाकण्याचे प्रत्त्युत्तर दानवे यांनी दिले.

विधान परिषदेत भाजपचे प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन त्यांच्या निषेधाचा ठराव करण्याची मागणी केली. प्रसाद लाड यांनीही तोच मुद्दा लावून धरला आणि विरोधी पक्षनेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ‘लोकसभा हे सर्वोच्च सभागृह आहे आणि तेथील चर्चेसंदर्भातील विषयाची या सभागृहात चर्चा करता येते का’, असा प्रश्न दानवे यांनी सभापतींना विचारला. सभापतींनी त्यावर उत्तर देण्यापूर्वी लाड हे सातत्याने दानवे यांना बोलण्याचे आवाहन करत होते.

लाड हे दानवे यांच्याकडे हातवारे करून बोलत असताना, ‘माझ्याकडे बघत हातवारे करू नका, पीठासीन अधिकाऱ्यांकडे पाहून बोला’, अशी सूचना दानवे यांनी त्यांना केली. त्यानंतरही लाड हे दानवे यांच्याकडे बोट दाखवून मोठ्याने बोलतच राहिले. त्यामुळे संतापलेले दानवे आपले आसन सोडून आक्रमकपणे शिवीगाळ करीत लाड यांच्या दिशेने धावले. या प्रसंगामुळे सभागृह अवाक झाले. लाड यांनीही प्रत्युत्तरादाखल शिवीगाळ केली. सभागृहात शिवीगाळ सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूचे सदस्य उठून बोलू लागले. दरेकर यांनी सभापतींकडे दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली. सभापती नीलम गोऱ्हे यांनी लाड यांनी दानवे यांच्याकडे हातवारे करीत बोलणे योग्य नसल्याचे आणि दानवे यांनीही सभागृहाच्या मर्यादा ओलांडल्याचे सांगत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

दानवेंवर कारवाई?

विधान परिषदेत झालेल्या शिवीगाळ प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून देण्यात आली आहे. दानवे यांच्याविरोधात कोणती कायदेशीर कारवाई करायची, याबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू झाली असून दानवे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT