Ambadas Danve esakal
महाराष्ट्र बातम्या

Ambadas Danve : ''मी निष्ठावान शिवसैनिक, कुठेही जाणार नाही'' अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका

''शिवसेना-भाजपचे विचार जुळतात, कारण २५ वर्षे आम्ही एकत्रित काम केललं आहे. परंतु शिवसेनेचा वेगळा बाणा आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत.'' अशी भूमिका अंबादास दानवेंनी स्पष्ट केली.

संतोष कानडे

Ambadas Danve News : ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा शुक्रवारपासून सुरु होत्या. मात्र मी कुठेही जाणार नसून, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दानवे म्हणाले की, माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवण्यात आलेल्या आहेत. मी निष्ठावान शिवसैनिक आहे. माझ्या तीस वर्षांच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या दिवशी खैरेंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी नाराजी असू शकते, रोज रोज नाराजी नसते.

''शिवसेना-भाजपचे विचार जुळतात, कारण २५ वर्षे आम्ही एकत्रित काम केललं आहे. परंतु शिवसेनेचा वेगळा बाणा आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत. उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी मी काम करणार आहे.'' अशी भूमिका दानवेंनी स्पष्ट केली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं की, शिवसेना आणि भाजपचे विचार एकच आहेत.. अंबादास दानवे हे आमच्याच विचारांचे आहेत. त्यावर अंबादास दानवेंनी शिवसेनेचा बाणा वेगळा असल्याचं म्हटलं. आपण कुठेही जाणार नसल्याचं दानवेंनी सांगितलं आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

  • मी ३० वर्षांपासून सेनेच काम करतोय

  • आम्ही भाजपासोबत होतो म्हणून त्यांच्यासोबत गेलो असं होत का ?

  • मी स्टार प्रचारक आहे, पक्षासाठी संपूर्ण राज्यात मी फिरणार आहे

  • मी इथे बसून जिल्ह्यात काम सुरु आहे, अशी यंत्रणा आमची आहे

  • मी अनेक गावात फिरुन आलोय, अजून बऱ्याच गावात मी जाऊन दौरा करणार आहे

  • चंद्रकांत खैरे आणि मी दोघांनी देखील तिकीट मागितलं होतं, एवढाच काय तो विषय

  • आता आम्ही खैरेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT