Ambadas Danve sakal
महाराष्ट्र बातम्या

Ambadas Danve : दानवे आजपासून कामकाजात सहभागी;निलंबनाची कारवाई तीन दिवसांवर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईत कपात करण्यात आली आहे.

प्रशांत पाटील

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईत कपात करण्यात आली आहे. पाच दिवसांचे निलंबन तीन दिवसांवर आणल्याने उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून अंबादास दानवे सभागृहात येणार आहे.  सभागृहातील गैरवर्तनाबद्दल अंबादास  दानवेंनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती.

अंबादास दानवेंच्या निलंबनांच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवेंच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी त्यांनी केली. दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची दखल घेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा निलंबन कालावधी तीन दिवस करत असल्याचे जाहीर केले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक वारंवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा गदारोळ झाला. यावेळी अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड  यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरी जाण्यासाठी बसची वाट बघत होते, बस काळ बनून आली; बेस्टने चिरडल्यानं चौघांचा मृत्यू, १० गंभीर

Accident News: दुर्दैवी घटना! साताऱ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू; कुंटूबियांचा आक्राेश, कामासाठी निघाले अन् काय घडलं?

किडनी विक्री प्रकरणाला कलाटणी; वैद्यकीय क्षेत्रातील ‘बडा मासा’ अटकेत, कंबोडियासह भारतातही झाल्या शस्त्रक्रिया

अग्रलेख - सरड्या-तेरड्याचे दिवस

Sugar Level Control: शुगर 200 च्या वर गेली? ‘या’ चुका अजिबात करू नका, नाहीतर धोका वाढू शकतो

SCROLL FOR NEXT