indian constituation sakal
महाराष्ट्र बातम्या

डॉ. आंबेडकरांचा वारसा ‘सिद्धार्थ’मध्ये जतन!

राज्यघटनेची स्वाक्षरांकित प्रत महाविद्यालयात सुरक्षित

प्रशांत कांबळे ,

मुंबई : वंचितांना न्यायहक्क मिळवून देणाऱ्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची मूळप्रत मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात जतन करून ठेवण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिल्यानंतर त्याच्या प्रती घटना समितीच्या सदस्यांना दिल्या होत्या. दरम्यान, बाबासाहेबांनी त्यांच्याकडील प्रत सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी शां. श. रेगे हे ग्रंथपाल होते. त्यांच्या निवृत्तीनंतर श्रीकांत तळवलकर यांनी ही प्रत आणि इतर साहित्यांचा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे. त्यात बाबासाहेबांच्या स्वाक्षरीची लहान मूळप्रत आणि एक मोठी प्रत अद्यापही महाविद्यालयात आहे.

ऐतिहासिक ग्रंथसंपदा

सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ, नोंदवही तसेच त्यावर बाबासाहेबांनी स्‍वतः केलेल्या स्वाक्षरीही आहेत. अकबराच्या नऊ रत्नांपैकी एका रत्नाचे हस्तलिखित ग्रंथ, शिवाय हिंदीतील कविता, संस्कृत वाक्यांचा हिंदी अर्थाचे हस्तलिखित जतन करण्यात आले आहे. यापैकी अनेक पुस्तके आणि साहित्य महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाला दिले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन यांनाही अनेक ग्रंथसाहित्य दिल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय मोहिते सांगतात.

बाबासाहेबांची अनेक दुर्मिळ पुस्तके आमच्या ग्रंथालयात आहेत. तसेच त्यांची हस्तलिखिते, हिंदी काव्य, टाचणे, उतारे संग्रही आहेत. त्यापैकी बहुतांश साहित्य शासनाकडे सुपूर्द केले असून त्याचे प्रकाशनही झाले आहे. देशपरदेशातून अभ्यासक संदर्भासाठी महाविद्यालयात येत असतात.

- डॉ. अशोक सुनतकरी, प्राचार्य

संविधानाची मूळप्रत हा अनमोल ठेवा आहे. तो सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्रंथपाल असताना त्याला काचेचे आवरण करण्याची सूचना व्यवस्थापनाकडे केली होती; मात्र दरम्यानच्या काळात ते शक्य झाले नाही.

- श्रीकांत तळवलकर, निवृत्त ग्रंथपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT