old pension scheme esakal
महाराष्ट्र बातम्या

Old Pension Scheme : नवीन पेन्शन योजनेमध्ये 'या' सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

संतोष कानडे

मुंबईः मागील तीन दिवसांपासून राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संप पुकारण्यात आलेला आहे. विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन दिलेलं आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने अशी जुनी पेन्शन योजना व्यवहार्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

दरम्यान, संपकरी आणि सरकार यांच्यामध्ये तोडगा निघालेला नसला तरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज एक मोठा निर्णय घेण्यात आला. नवीन पेन्शन योजनेमध्ये राज्य सरकारने सुधारणा केली असल्याची माहिती आहे.

हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

नवीन पेन्शन योजनेमध्ये कुटुंब निवृत्ती वेतन आणि कर्मचाऱ्याचं मृत्यू योगदान देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती असून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

नेमकं निवृत्ती वेतन कसं आणि किती मिळणार याबाबत स्पष्टता नाही. मात्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 'एबीपी माझा'ने याबाबते वृत्त दिले आहे. सरकारकडून संपकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र संपकरी काय निर्णय घेतात, हे कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

Malshej Ghat Project Protest: माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी मढ येथे आदिवासींचा ‘गाढव मोर्चा’ व रास्ता रोको; अदानी हटाओ, सह्याद्री बचावोच्या घोषणा

SCROLL FOR NEXT