Bhagat Singh Koshyari  esakal
महाराष्ट्र बातम्या

BhagatSingh Koshyari : राज्यपालांना दिल्ली दौरा महागात पडणार?

राज्यपाल आज उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार

सकाळ डिजिटल टीम

राज्यपालभगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांना थेट पदावरुन हटवण्याची मागणी होताना दिसत आहे. अशातच राज्यपाल कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.(Amidst Shivaji controversy, Koshyari to make an unscheduled visit to Delhi)

काही दिवसांपूर्वी कोश्यारींनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये राज्यपाल आज उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. कोश्यारींचा दिल्ली दौरा वादग्रस्त विधानानंतर होत असल्याने दिल्लीत बसलेले पक्षश्रेष्ठी कोश्यारींची कानउघडणी करणार की उचलबांगडी हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.

अशातच काल, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडेच राज्यपालांना पदावरुन दूर करावं, अशी मागणी केली आहे. त्यामुळे कोश्यारीसंदर्भात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT