Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: अमित शाहंच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान बंद दाराआड चर्चा; पुढील निवडणूक शिंदेंच्या...

मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. अमित शहा काल पुन्हा मुंबई दौऱ्यावर आले होते. (Latest Marathi political news)

राज्यात 2019च्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर बैठकीत काय झालं काय नाही झालं यावर बराच काळ चर्चा झाली होती .यानंतर मोठी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. काल देखील अशीच चर्चा बंद दाराआड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात झाली असल्याची माहिती आहे.

राज्यातील आगामी सर्व निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढवल्या जातील असं आश्वासन अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेना युतीची धुरा आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत सर्वाचं एकमत झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु होत्या. एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यासाठी कधीही तयार राहण्याच्या सूचना भाजप नेतृत्वाकडून मिळाल्याच्याही चर्चा राज्यात जोर धरू लागल्या होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर ही आजची बैठक झाल्याची माहिती आहे. (Latest Political Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT