Amit Shah PTI
महाराष्ट्र बातम्या

अमित शाह नगरमध्ये दाखल, सहकार परिषदेला सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज प्रवरानगर येथे राज्यातील पहिली सहकार परिषद (Sahakar Parishad Pravaranagar) घेत आहेत. शाह नगरमध्ये दाखल झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांसारखे भाजपचे मोठे नेते उपस्थित आहेत.

देशात पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार करण्यात आलं आहे. त्याचं मंत्रिपद अमित शाह यांच्याकडे देण्यात आलं. त्यानंतर अमित शाह पहिल्यांदा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज सहकाराची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सहकार परिषद घेऊन सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शाह इथे येत आहेत, असं फडणवीसांनी शाह यांच्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितलं.

आमदार राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ लोक यात सहभागी झाले आहेत. शिवाय सहकार विषयावर चर्चा होणार आहे. अमित शाह आज शिर्डी येथे साई दर्शनाने आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार होते. पण, वेळेवर नियोजन बदलले. त्यामुळे शाह थेट सहकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. सहकार परिषदेत विचारमंथन झाल्यानंतर अमित शाह साई दर्शनासाठी रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT