Amit Shah  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah : शाहांची चाणक्य नीती! मुंबई महापालिकेतून शिंदें गटाचा पत्ता कट होणार?

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Amit Shah Mumbai Tour : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान शाहांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार असल्याचे विधान व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले असून, मुंबई महापालिकेच्या विजयातून एकनाथ शिंदेंचा आणि शिंदे गटाचा पत्ता कट करण्याचा भाजपचा डाव असल्याचे जाणकारांचे मत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता असून, ही सत्ता भाजपकडे आणण्यासाठी भाजपचे अनेक वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यात अमित शहांनी आगामी काळात मुंबईवर केवळ आणि केवळ भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत शिंदे गटाला महापौरपद मिळणार नसल्याचे शाहांच्या आजच्या विधानावरून जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाचा महापालिकेतून पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

हिंदूविरोधी राजकारण संपवायचंय - शाहांचा इशारा

उद्धव ठाकरेंना जमीन दाखवायची वेळ आली आहे असं म्हणत शाहांनी आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचं आहे असं सूतोवाच केलं आहे. मुळात शिवसेना ही हिंदुत्त्ववादी विचारांची असली तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाची धार बोथट झाली असल्याचा आरोप शिवसेनेवर होत आहे. त्यानंतर आता मुंबईतून संपूर्ण शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे का? असाही सवाल निर्माण झाला आहे.

शिवसेना अन् ठाकरेंवर हल्लाबोल

पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शाहांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेने आमच्या पाठित खंजीर खुपसला असून, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटी झाल्याचे ते म्हणाले. केवळ दोन जागांसाठी शिवसेने युती तोडल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली असून, बीएमसीसाठी भाजपचं 150 जागांचं टार्गेट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदेंचीच सेना खरी शिवसेना

बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू असून, यावर अद्यापपर्यंत सुप्रीम कोर्टाने कोणताही अंतिम निर्णय सुनावलेला नाही. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा पेच कायम आहे. मात्र, शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करत एकनाथ शिंदे यांची सेनाच खरी शिवसेना असल्याचं शाह यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: संदीप क्षीरसागरांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न? एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा डाव

Pune News : औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीरपणे विक्री; औषध विक्रेत्या संघटनांची बंदी घालण्याची मागणी

Eknath Shinde: विरोधकांच्या विरोधाची हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शरसंधान

Yermala News : संपूर्ण धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने प्रभावीत झाला असताना राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशी दौरा दुटप्पी पणाचा

Latest Maharashtra News Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी; केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार, काहींची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT