Amit Shah pune tour esakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah : ''जो येणार तो आमचाच आहे, आता कुणीही नातेवाईकांना नोकरी लावू शकणार नाही'' शाह नेमकं काय म्हणाले?

संतोष कानडे

पुणेः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवड येथे सहकार विभागाच्या पोर्टलचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना अमित शाह म्हणाले की, मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सहकार विभागाचे सचिव आणि त्यांच्या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये हा कायदा आमलात आणण्यासाठी कष्ट घेतले. २ तारखेला कायदा तयार झाला आणि ४ तारखेला लागू झाला.

अमित शाह पुढे म्हणाले की, मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अॅक्टअंतर्गत निवडणूक व्यवस्थेमध्ये सुधार, को-ऑपरेटिव्ह गव्हर्नन्स, व्यापारी सुलभता आणि स्वतंत्र निवडणूक आयोग नेमण्यात आलेला आहे. आता कुणीही आपल्या पुतण्या-भावाला नोकरीला लावू शकणार नाही. बोर्ड चालवण्याच्या नियमांत मोठे बदल केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

''जो येणार तो आमचाच आहे. ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. सहकाराला गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सहकाराच्या ऑडिटची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलीय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात सहकाराला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम करणार आहोत'' असा विश्वास यावेळी अमित शाह यांनी बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT