Shraddha Murder Case esakal
महाराष्ट्र बातम्या

Shraddha Murder Case: महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी? अमित शहांनी उपस्थित केले सवाल

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहमंत्री शाह यांनी श्रद्धाने पालघर पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीचा संदर्भ देत मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे. (Amit Shah Shraddha Murder Case Maharashtra Police )

‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जाचा दाखला देत अमित शाह यांनी मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे.

दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी श्रद्धा हत्याकांडप्रकरणावर भाष्य केले. ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला सध्याच्या स्थितीत (कायद्यानुसार) कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल,” असा विश्वास व्यक्त केला.

तसेच, श्रद्धाने पालघर पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीचा संदर्भ देत आफताब तिची हत्या करू शकतो. असे तिने म्हटले होते. तरीही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. असा इशाराही मुंबई पोलिसांना त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आफताब श्रद्धाला मारहाण करायचा. नोव्हेंबर २०२० रोजी आफताबला बेदम मारहाण केली होती. यामुळे ती तीन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. या मारहाणीनंतर २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा ने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. आफताब माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकणार आहे, असे या तक्रारीत स्पष्ट लिहिले होते. हा अर्ज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे तकार असूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

श्रद्धाच्या अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी पण...

‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जावर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली होती. मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने ही तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT