amit shah esakal
महाराष्ट्र बातम्या

अमित शहा आज नांदेड दौऱ्यावर; राजकीय वर्तुळाचं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजप नेतृत्वाने मोठे बदल केले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार का? असे भाकित वर्तविले जात आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे आज (ता.१७) महाराष्ट्रात येत असून नांदेड जिल्ह्यात त्याचा दौरा आहे. सीआरपीएफने आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहीमेत अमित शहा सहभागी होणार आहेत. तसंच सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमधील नेत्यांची ईडीकडून चौकशीबाबत अमित शहा काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

अमित शहा नांदेडमध्ये; भाजप नेत्यांना भेटणार का?

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काल (ता.१६) मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दोन तीन दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणासह राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमधील नेत्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अमित शहा या दौऱ्यात राज्यातील भाजप नेत्यांना भेटणार का? तसंच अमित शहा काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

अमित शहा हे आज (ता.१७) नांदेडसह तेलंगणातील निर्मल जिल्ह्याचाही दौरा करणार आहेत. 'तेलंगण मुक्ती दिना'निमित्त भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. तेलंगण मुक्ती दिन म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसंच अमित शहा हे यावेळी रक्तदान शिबिराचंही उद्घाटन करणार आहेत. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Honda Avancier SUV : ७ सीटर फॅमिली एसयूव्ही सेगमेंटमध्ये होंडाचा मोठा धमाका! नव्या 'H' लोगो, नेक्स्ट-जनरेशन हायब्रिड आणि इलेक्ट्रिक AWD सह 'अव्हान्सियर' सादर; भारतात कधी येणार?

ना मराठी मातृभाषा, ना महाराष्ट्र जन्मभूमी; तरीही परदेशी कलाकाराच्या मराठी प्रेमाची सोशल मीडियावर चर्चा!

भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घसरण; एका आठवड्यात तब्बल १४.२ अब्ज डॉलरची घट, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दोनच दिवसांत सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रद्द

IND A vs Nepal: सुरुवात खराब, पण शेवट गोड! तिलक वर्मा कुमार कुशाग्राची धडाकेबाज शतके; भारताने उभारला धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT