Amit Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Amit Thackeray on Toll Plaza: टोलबाबत मनसेची भूमिका काय? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, टोलला विरोध नाही...

महामार्गांवरील बेकायदा सुरु असलेल्या टोलविरोधात मनसेनं वारंवार आक्रमक पाऊल उचललं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महामार्गांवरील बेकायदा सुरु असलेल्या टोलविरोधात मनसेनं वारंवार आक्रमक पाऊल उचललं आहे. पण महामार्गांवर प्रवाशांना सुविधांच्या बदल्यात टोल वसुली केली जात असताना मनसेचा टोलला खरंच विरोध आहे का? याबाबत खुद्द मनसे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. (Amit Thackeray told MNS role on Toll Plaza He said there is no opposition to toll but facilities should be provided there)

माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पष्ट भूमिका आहे. आमचा टोलला विरोध नाही. पण जी टोलवसुली होते त्यातून खरंच लोकांना सुविधा दिल्या जातात का? रस्ता सुस्थितीत असतो का? अपघात झाला तर वैद्यकीय मदतीसाठी काही सुविधा असतात का? स्वच्छतागृह असतात का? टोलवसुलीतून येणाऱ्या पैशांचं होतंय काय? हे आम्हाला आणि जनतेला पडलेले प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यायची कोणी?

तीन महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत थेट टोलनाके जाळण्याचा इशारा दिला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर तोडफोड-जाळपोळ केली होती. या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना फेसबूक पोस्ट लिहून भूमिका स्पष्ट करावी लागली होती. टोल आंदोलनासंदर्भात पुढील सुचना येईपर्यंत कोणतंही पाऊल उचलू नये असं स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

"त्याने पॅन्टमध्ये हात टाकला आणि.." मराठी अभिनेत्रीने उघड केला तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार !

Marathi Ekikaran Samiti Protests : दादरच्या कबुतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक...पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Viral Video : धक्कादायक ! महिलेने बेकरीतून आवडीने खरेदी केला करी पफ, उघडताच निघाला साप, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Updates Live: नागपूरमध्ये मेट्रो स्टेशन परिसरात मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT