Amit Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

अमित ठाकरेंचं पुण्यात जोरदार स्वागत; पक्षबांधणीसाठी ३ दिवसांचा पुणे दौरा

अमित ठाकरे यांच्या पुणे संपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

धनश्री ओतारी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुणे संपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मनसे नेते हे अमित ठाकरे ३ दिवस पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. आज, शुक्रवारी त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देत अमित ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले.(Amit Thackeray Visit To Pune For Three-Day From August 12)

अमित ठाकरे यांचे १५ फुटांहून मोठा हार घालत कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आले आहेत.

महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा आखण्यात आला आहे. तसेच अमित ठाकरे सगळ्या मतदार संघात जाऊन पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. पुण्यात ८ आणि शिरुरमधील ५ मतदार संघात जाऊन अमित ठाकरे तिथल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या कालावधीत ते महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात त्यांचा दौरा असेल.

राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधणीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागात फिरतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

असा असणार आहे तीन दिवसीय दौरा

१२ ऑगस्ट- शहरातील कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी दौरा शुक्रवारी

१३ ऑगस्ट- पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहे.

१४ ऑगस्ट- दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी शिरूर, चाकण आणि खेड मध्ये त्यांचा दौरा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT