Amol Mitkari esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Mitkari: पुण्यातल्या देखाव्यावरुन अजित पवारांबाबत मिटकरींचं मोठं विधान; म्हणाले, ...यावर दुमत नाही

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या घडामोडींना वेग आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पुण्यातील एका गणेश मंडळानं केलेल्या देखाव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या देखाव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांबाबत एक मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या घडामोडींना वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर हा देखावा आमच्या अंतर्मनातील देखावा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (Amol Mitkari big statement about Ajit Pawar over Ganesh Dekhava in Pune)

लोकशाहीत प्रॅक्टिकल महत्वाचं

मिटकरी म्हणाले, "जो देखावा पुण्यातील गणेश मंडळानं सादर केला आहे, ती महाराष्ट्रातील प्रत्येकाची भावना आहे. मी यापूर्वी देखील ही भावना बोलून दाखवली आहे. अजितदादांना असं बोललेलं आवडत नाही, कारण लोकशाहीत प्रॅक्टिकल असणं महत्वाचं आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Marathi News)

त्यात दुमत असण्याचं कारण नाही

अजित पवारांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे आणि अजित पवारांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, अशा आशयाचा देखावा पुण्यात साकारला गेला आहे. तो आमच्या अंतर्मनातील देखील देखावा आहे.

आम्ही गणपतीकडं घातलेलं साकडं पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. मला विश्वास आहे की आगामी काळात २०२४ मध्ये अजित दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाईल, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादी सर्वकाही शांत

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी प्रफुल पटेल आणि शरद पवारांचा फोटो व्हायरल झाला होता. यावर बोलताना मिटकरी म्हणाले, "शरद पवारांना सर्वच जण भेटत असतात आम्ही अधुनमधून भेटत असतो. सध्या राष्ट्रवादीतील सर्वकाही शांत आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT