amol mitkari challenge to jitendra awhad makes blunder while writing cheque Tutari man blowing turha NCP Crisis  
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : आव्हाडांची तुतारी वाजली पण... एक लाखांच बक्षीस जाहीर करणाऱ्या मिटकरींनी घातला घोळ

Amol Mitkari Challenge to Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी हे दोघे तुतारी वाजवण्यावरून एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

Amol Mitkari challenge to Jitendra Awhad makes blunder while writing cheque : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता आगामी निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवारांचा गट एकमेकांसमोर उभा ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याने शरद पवार गटाने दुसरे पर्याय निवडले आहेत.

आज किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' पक्षाच्या 'तुतारी' या पक्षचिन्हाचे अनावरण आज पार पडले. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजवतली. यावर अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी यांनी आव्हाडांना पुन्हा थेट आव्हान दिलं आहे.

तुतारी फुंकून दाखवा आणि एक लाख रुपये घेऊन जा असं आव्हान मिटकरींनी आव्हाडांना दिलं होतं. यानंतर आज रायगडावर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजवत आव्हान स्वीकारलं आणि पूर्ण करून दाखवल्याची चर्चा सुरू होती. यानंतर अमोल मिटकरी यांनी आव्हाडांनी एकट्याने तुतारी वाजवून दाखवावी आणि तयार असलेला एक लाखाचा धनादेश घेऊन जावा असं दुसऱ्यांदा आव्हान दिलं आहे.

आव्हाडांचा व्हिडीओ दाखव मिटकरी म्हणाले की, तुतारी वाजवताना आव्हाडांचं पोट पुढं आलं आहे. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवत आहेत. आव्हाडांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. एक लाखांचा चेक तयार आहे. त्यांनी तुतारी आणावी आणि पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि एक लाख घेऊन जावा असे मिटकरी म्हणाले. यावेळी मिटकरींनी व्हिडीओवरती चेक दाखवला देखील. मात्र अमोल मिटकरी य़ांनी दाखवलेल्या त्या धनादेशात एक मोठी चूक आहे.

धनादेशात पेई अर्थात ज्याच्या नावे धनादेश काढला जातो, तिथे मिटकरींनी रक्कम लिहिली आहे. तर जिथे रक्कम लिहायची, तिथे जितेंद्र आव्हाडांचं नाव लिहिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देताना, त्यांच्या नावाचा धनादेश लिहिताना मिटकरी चूक केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

आव्हाडांसाठी तयार केलेल्या धनादेशात पेई अर्थात ज्याच्या नावे धनादेश काढला जातो, तिथे मिटकरींनी रक्कम लिहिली आहे. तर जिथे रक्कम लिहायची, तिथे जितेंद्र आव्हाड यांचं नाव लिहिलं आहे. मिटकरींनी हा धनादेश लिहीताना केलेल्या चुकीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT