अमोल मिटकरी
अमोल मिटकरी गुगल
महाराष्ट्र

आमदार मिटकरींच्या अडचणी वाढणार? नाशिकमध्येही गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांना दिलाय

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथे केलेल्या एका भाषणात एका विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी महिलांविषयी ही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता मिटकरी यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होतं आहे. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. आमदार मिटकरी यांच्यावर अकोलानंतर आता नाशिकमध्येही तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. महिला आणि ब्राम्हण समाजासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली आता नाशिकचे साधू महंत आणि ब्राम्हण संघटना यांनी ही तक्रार दिली आहे.

दरम्यान, दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. आज दुपारी विवध ब्राम्हण संघटनांची बैठक होणार असून त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. अमोल मिटकरी यांच्या बाबत तक्रार देताना तक्रारदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नाशिक रोड उपनगर पोलिस स्थानकांत सर्व समाज बांधव आले असून मिटकर यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागण या संघटनांनी केली आहे. मिटकरी यांची वृत्ती आसुरांना लाजवणारी असल्याने याचे समूळ उच्छाटन व्हावे. यासाठी शासना मार्फत त्यांच्यावर योग्य की कारवाई केली जावी. आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर समजाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील इस्लमापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या व्यक्तव्याने एका विशिष्ट जाती व संविधानाचा अवमान केला असल्याची तक्रार अकोला येथील ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला केली आहे. आमदार मिटकरी यांनी हीन दर्जाचे तथ्यहीन, आधारहीन धार्मिक भावना भडकवणारे, धार्मिक मोरीती स्त्रोताचे अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे व ब्राह्मण समाजाची मानहानी करणारे व अपमानित करणारे व्यंगात्मक भाषण केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT