rohit pawar and amol mitkari 
महाराष्ट्र बातम्या

"हम आह भी भरते है तो, बदनाम हो जाते है, और वो..."; मिटकरींची रोहित पवारांवर जोरदार टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून या गटांमधील टीकाटिप्पणी आता वाढली आहे. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार अनेकदा अजित पवार गटावर टीका करताना दिसतात. आज अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर शेरो-शायरीच्या माध्यमातून टीका केली.

अमोल मिटकरी म्हणाले की, आजकाल दादा होण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. काय शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांबाबत बोलतात. महाराष्ट्रात आता दोनच माणसं फुले-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. ते म्हणजे आव्हाड आणि रोहित पवार आहेत, अशी उपरोधीक टीका मिटकरी यांनी केली.

.

ते पुढं म्हणाले की, आमचा विचारधारेशी संबंधच नाही, असं रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड बोलतात. मात्र वाय बी चव्हाण सेंटरवर हेच रोहित पवार शरद पवार साहेबांसमोर म्हणत होते की, आमच्या मतदार संघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत सामील व्हायला पाहिजे. ही भूमिका रोहित पवारांची होती.

दरम्यान "हम आह भी भरते है तो, बदनाम हो जाते है, और वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होती, वाह रे वाह, अशा शब्दात मिटकरी यांनी रोहित पवारांना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT