Amol Mitkari News 
महाराष्ट्र बातम्या

Amol Mitkari News: "फडणविसांनी भिडेंना गुरु मानावं, ते त्यांना लखलाभ"; मिटकरी जुन्या आवेशात, भाजपला घरचा आहेर

Sandip Kapde

Amol Mitkari News: आज विधानपरिषदेत काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले आणि साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावेळी सभागृहात सत्तेत असलेले अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी देखील उपस्थित होते. त्यांनी आक्रमक होत संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केली.

संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर मी आक्षेप घेतला. संभाजी भिडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी गुरू मानलं असेल तर तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. मात्र जिथे भिडे असतील तिथून त्याला लवकरात लवकर उचला. नुसता गुन्हा दाखल करून काहीही होणार नाही.

मिटकरी म्हणाले, सत्ता असणं आणि नसणं याचा काही सबंध नाही. महापुरुषांचा अपमान होणार असेल तर विरोध केलाच पाहिजे. भिडे यांची वक्तव्य जाणूनबुजून येत आहेत. त्यांना राजाश्रय देऊ नये. आम्ही सरकारमध्ये असलो तरी तत्वांशी तडजोड केली नाही.

भिडेंचे चालणे बोलणे म्हणजे डोक्यावर परिणाम झाला आहे. संभाजी भिडे यांच्यासारखी घाण, विकृती, कुविचारधारा हद्दपार झाली पाहिजे. नीच प्रवृत्तीच्या माणसाला देव मानू नये, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांना गुरु मानव, त्यांचे फोटो लावावे ते त्यांना लखलाभ. आमचे गुरु हे फुले शाहू आंबेडकरच. सरकारने भिडे नाही मनोहर कुलकर्णी यावर कारवाई करावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी साम टिव्हीसोबत बोलताना केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT