Adani-Ambani Sakal
महाराष्ट्र बातम्या

'अहो दाजी, हेच का ते रंजले गांजले?'; मिटकरींचा फडणवीसांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रंजल्या गांजल्यांसाठी काम करतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

दत्ता लवांडे

मुंबई : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण केले. त्यावेळी सभेत बोलताना त्यांनी तुकारामांच्या अभंगाचा उल्लेख केला. अभंगांचे उदाहरण देत त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांनी उपदेश केला आहे. यावेळी त्यांनी तुकारामांचा 'जे का रंजले गांजले' हा अभंग म्हणून दाखवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंतप्रधानावर टीका करत देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे.

(Amol Mitkari On Devendra Fadnavis)

अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत रंजले गांजले कोण आहेत? असा सवाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भागवत धर्माचा आणि विचारांचा प्रसार करत आहेत. ते रंजल्या गांजल्यासाठी काम करत आहेत असं वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

त्यानंतर मिटकरी यांनी अनिल अंबानी आणि गौतम अदानी यांचाय फोटो लावत हेच आहेत का रंजले गांजले? असा सवाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी आणि अंबानी यांच्यासाठी काम करतात असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी केला आहे. "अहो दाजी, हेच का ते रंजले गांजले?" असं लिहित त्यांनी फोटो ट्वीट केला आहे.

दरम्यान काल नरेंद्र मोदी यांनी तुकारामांचा अभंग म्हणून दाखवला होता.

जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले |

तोची साधु ओळखावा | देव तेथेची जाणावा |

हा अभंग त्यांनी आपल्या भाषणात म्हणून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT