Amol Mitkari said, Uddhav Thackeray will perform the Maha Puja of Panduranga
Amol Mitkari said, Uddhav Thackeray will perform the Maha Puja of Panduranga Amol Mitkari said, Uddhav Thackeray will perform the Maha Puja of Panduranga
महाराष्ट्र

बंडखोरांसाठी मिटकरींचे ट्वीट; "एकादशी" तिकडे अन्...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सोमवारी (ता. २७) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. बंडखोर आमदारांना पाठवलेली अविश्वासाची नोटीस अवैध होती. ही नोटीस कोणत्याही अधिकृत ई-मेल वरून पाठवली नव्हती. एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने ही नोटीस आली होती. त्यामुळे ही ग्राह्य धरण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव ११ जुलैपर्यंत फेटाळण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची प्रतिक्रिया आली आहे. (Amol Mitkari said, Uddhav Thackeray will perform the Maha Puja of Panduranga)

‘अखेर पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) साहेब यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले. याचा अर्थ महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री महापूजा करतील. तोवर बंडखोरांनी गुवाहाटी थांबण्यास हरकत नाही. ‘एकादशी’ तिकडे आणि द्वादशी हिकडे’ असे ट्विट अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच नोटीसला पाच दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT