Amol Mitkari esakal
महाराष्ट्र बातम्या

..म्हणून अमोल कोल्हे नथुराम गोडसेंच्या विचारांचे झाले असे होत नाही : अमोल मिटकरी

'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात अमोल कोल्हे हे नथुराम गोडसे यांची भूमिका साकारत आहेत.

गणेश पिटेकर

मुंबई : २०१७ मध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी साकारलेले नथुराम गोडसे यांचे पात्र ही केवळ एक कलाकृती आहे. म्हणून खासदार कोल्हे साहेब नथुराम गोडसे यांच्या विचारांचे झाले असे होत नाही. प्रत्येक कलाकाराचा धर्म हा दिलेल्या भूमिकेत जिवंतपणा देणारा असतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अमोल कोल्हे यांचे समर्थन केले आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात कोल्हे हे नथुराम गोडसे यांची भूमिका साकारत आहेत. यावरुन सध्या वाद सुरु झाला आहे.(Amol Mitkari Stand With Amol Kolhe Over Nathuram Godse Role In Why I Am Killed Gandhi Movie)

पुढे मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की आयुष्यभर 'रामभक्त' असणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी रामायणात साकारलेल्या 'रावण' पात्राचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले होते. रामभक्त असताना त्यांनी रावणाचे पात्र स्वीकारले कारण कुठल्याही कलाकाराचा धर्म हा कलाकृतीला जिवंतपणा देणारा असतो. (Mumbai)

यावर प्रमोद के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मग शरद पोंक्षेला तुम्ही विरोध का करता? बाजारू विचारवंत या बद्दल बोलतील का? पैसे कमवण्यासाठी जो कलाकार, ज्यांनी गांधीजी यांची हत्या केली अशा गोडसेच समर्थन करणारा चित्रपटात काम करतो. ते निश्चित निषेधार्थ आहे. # बाजारू विचारवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT