amravati ICU of District Women's Hospital fire  esakal
महाराष्ट्र बातम्या

Amravati : लहान मुलांच्या ICU ला आग; 2 मुलं किरकोळ जखमी

सकाळ डिजिटल टीम

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या आयसीयू कक्षाला ही आग लागली. वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये 2 मुलं किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (amravati ICU of District Women's Hospital fire )

ही आग लहान मुलांच्या आयसीयू वार्डात लागल्याने इथे असलेल्या लहान मुलांना तातडीने दुसऱ्या वार्डात शिफ्ट करण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या आगीमध्ये दोन बालकं किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मात्र, ही आग कशी लागली हे अद्याप समोर आलेल नाही. या घटनेनंतर अमरावती दौऱ्यावर आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी याठिकाणी पाहणी करून घटनेची माहिती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT