mp navneet rana  sakal
महाराष्ट्र बातम्या

अमरावतीची जागा NCPची असली तरी आमचं प्रभुत्व; काँग्रेसच्या दाव्याने नवनीत राणांच्या अडचणी वाढणार?

रवींद्र देशमुख

अमरावीत - हनुमान चालीसावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणाऱ्या नवनीत राणा यांचा मतदार संघ असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघावर काँग्रेसने हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. तसेच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असली तरी, येथे प्रभुत्व काँग्रेसचं असल्याचं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती लोकसभा ही काँग्रेसची आहे. आता ही जागा परत आम्हाला मिळावी, हा हट्ट आम्ही करणार आहोत. सहकारी पक्षाला जागा सोडावी लागते आणि तो निवडून आला की, बदलून जातो. सगळ्यांना वाटते की, मागचा खासदार आपण निवडून दिला आणि त्या खासदाराने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जरी जागा राष्ट्रवादीची असली तरी त्यावर काँग्रेसचे प्रभुत्व आहे, असंही ठाकूर यांनी नमूद केलं.

२०१९ मध्ये नवनीत राणा राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा जाहीर केला. तसेच राज्यातही महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. यातून नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT