Amravati Murder Case esakal
महाराष्ट्र बातम्या

Amravati Murder Case: क्रुरतेचा कळस! मानेची जखम ८.2 सेमी खोल; मणक्यापर्यंत घाव

नुपूर शर्मा यांच्या पोस्ट चे समर्थन केल्यामुळे अमरावतीमधील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती

धनश्री ओतारी

नुपूर शर्मा यांच्या पोस्ट चे समर्थन केल्यामुळे अमरावतीमधील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.हत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. मानेच्या डाव्या बाजूला हल्ला झाला होता. ही जखम 8.2 सेमी इतकी खोल आहे.(Amravati Murder Case)

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 17 व्या मुद्द्यात, मानेच्या डाव्या बाजूला चाकूपासून मणक्यापर्यंत खोल जखम असल्याचे म्हटले आहे. डाव्या स्टर्नोक्लाइडोमास्टॉइड स्नायू, गुळाच्या शिरा आणि कॅरोटीड धमनी तसेच अन्ननलिकेपर्यंत खोल जखमा आहेत. त्याचवेळी डाव्या पायाला चिरलेली जखमही पाहायला मिळाली.

काय आहे प्रकरण?

नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे.

त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT