Sambhaji Bhide Controversy Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide Controversy: भिडेंच्या अडचणी वाढणार? 8 दिवसात हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस, ऑडिओची होणार फॉरेन्सिक तपासणी

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची ‘ऑडिओ’ची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून केली जात आहे. तर संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काल विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाल्याचे दिसुन आले. तर राज्यातील सरकार त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर या संदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

अमरावतीमध्ये 27 जुलै रोजी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तर राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे. त्याचबरोबर संभाजी भिडे यांना 8 दिवसात अमरावती पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

संभाजी भिडे यांना दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं मांडण्याची सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे 8 दिवसात संभाजी भिडे अमरावती पोलिसांकडे हजर राहणार का? आणि आपली बाजु मांडणार का? याकडे लक्ष लागलं आहे. तर याच संदर्भात राज्यात ज्या ठिकाणी भिडेंवर गुन्हे दाखल झाले, त्या ठिकाणचे गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

काय आहे संपुर्ण प्रकरण?

संभाजी भिडे यांनी 27 जुलै रोजी एका मंगल कार्यालयात जाहीर सभा झाली होती. त्यादरम्यान त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करुन व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजघटकांमध्ये वाद वाढवणारे भाष्य केलं. त्याचबरोबर देशातील महापुरुषांची बदनामी केली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे, निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT