Bachchu Kadu Vs Rana esakal
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu: पहिलीच वेळ आहे म्हणून जाऊ देतो, इथून पुढं जर...

सकाळ डिजिटल टीम

अमरावतीः आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. या गंभीर आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. राणांच्या आरोपांना आज आमदार बच्चू कडू यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

अमरावती येथे आयोजित मेळाव्यात आमदार बच्चू कडू बोलत होते. आज ते भूमिका जाहीर करणार असल्याने राज्याचं लक्ष त्यांच्याकडे लागून राहिलं होतं. यावेळी बोलतांना आमदार कडू म्हणाले की, आरोप करणाऱ्यांची पहिलीच वेळ आहे म्हणून माफ करतो, इथून पुढं आमच्या वाट्याला गेलात तर सोडणार नाही; असा इशारा बच्चू कडू यांना रवी राणा यांना दिला.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, आम्हीही आमच्या बाजूने अपशब्द बोलणार नाही, आचारसंहिता पाळू. पण समोरुनही नियम पाळले गेले पाहिजेत. आम्ही आजपर्यंत उपेक्षितांसाठी काम केलं आहे. सत्ता असो वा नसो कधीच फरक पडत नाही. राज्यमंत्री असतांना ११८२ बैठका घेतल्या. कामगाराच्या फक्त मेसेजवर मीटिंग लावल्या आहेत. त्यामुळे आमच्यामागे लोकांचं प्रेम आहे.

''येत्या काळात सत्तेच्या दोऱ्या आपल्या हातात पाहिजेत. आपण म्हणू तशी सत्ता हलली पाहिजे. त्यासाठी आपल्या विचारांचे लोक वाढले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करु'' असं म्हणत बच्चू कडू यांनी मेळाव्याला संबोधीत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

SCROLL FOR NEXT