महाराष्ट्र बातम्या

माजी गृहमंत्र्यांचे हनीमून कुठे सुरुये? - अमृता फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

सामनामधून भाजपवर सोडल्या जाणाऱ्या टीकेच्या बाणांवरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीकास्र सोडले आहे. माजी गृहमंत्र्यावर वसुलीचा आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. तसंच माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या कुठे आहेत याची माहितीसुद्धा नाहीय. यावरूनच अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज्याचे माजी गृहमंत्री असुदेत किंवा मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त असुदेत. सध्या त्यांचे हनीमून कुठे सुरु आहेत ते शोधून काढायला हंव. तुम्हा माध्यमांना कळलं तर त्याचा रिपोर्ट यंत्रणांना द्या, म्हणजे त्यांना लवकर पकडता येईल.

मुंबईतील सीपी टँक रोड इथं देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलाताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांच्याकडून तपासाला सहकार्य केलं जात नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी म्हटलं की, त्यांना मस्ती आली आहे. त्यांचे हनीमून कुठे सुरु आहेत याची माहिती शोधायला हवी.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, त्यांची कामेच तशी आहेत म्हणून आरोप तसे होतायात. तुम्ही भजन करताय म्हणून आरोप केले नाहीत ना? जलयुक्त शिवार सारख्या योजनेवर जर तुम्ही आरोप करत असाल तर आम्हीही जे समोर दिसत आहे त्यावर आरोप करू शकत नाही का? असा प्रश्नही अमृता फडणवीस यांनी विचारला.

सामनामधून भाजपवर सोडल्या जाणाऱ्या टीकेच्या बाणांवरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, ते भाजपवर टीका करणारच, त्यांना माहिती आहे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्याचं वसुली सरकार कसं चालणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

Manchar News : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलीप वळसे पाटील यांची मागणी

Kolhapur Gokul Politics: सतेज पाटलांसोबतच्या छुप्या मैत्रीचा आरोप करत महायुतीत मुश्रीफांना एकटं पाडण्याचा डाव?

Gill - Ishan Century: कर्णधार शुभमन गिलचं दमदार शतक! ईशान किशनने चोपलं, पण रोहितचं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Live Update : भीमाशंकर मंदिरात आता दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत मोफत दर्शन

SCROLL FOR NEXT