महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने मोदींना दिल्या शुभेच्छा; पण झाल्या ट्रोल!

वृत्तसंस्था

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देत असताना त्यांनी मोदींचा उल्लेख पंतप्रधान म्हणून करण्याऐवजी राष्ट्रपिता (Father of our Country) असा केला आहे.

अमृता फडणवीस यांनी याबाबतचे ट्विट केले. या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, की आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तसेच त्यांनी या ट्विटसोबत 'ओ रे मनवा तू तो बावरा है', हे स्वत:च्या आवाजात गायलेले गाणंही ट्विट केले. ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

सेल्फीमुळे वादात

मुंबई ते गोवा या जलमार्गावरील ‘आंग्रीया’ क्रूझच्या डेकवर सुरक्षारक्षकांना डावलून अमृता फडणवीस यांनी सेल्फी काढला होता. त्यांच्या या सेल्फीनंतर त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या या ट्विटमुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil: तेलाचा दर 2022 इतकाच… तरी भारतासाठी 24% महाग का? आणि दर कमी झाले तरी पेट्रोल का स्वस्त होत नाही?

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT