Devendra Fadnavis Amruta Fadnavis
Devendra Fadnavis Amruta Fadnavis Sakal
महाराष्ट्र

Amruta Fadnavis : हा सगळा कट देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठी? पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याचं प्रकरण सध्या चांगलंच वादात आहे. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत.

हा सगळा कट देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठी आखण्यात आला असावा, असा दावा पोलिसांनी केला आहे. अनिक्षाने अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे काही बनावट व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपही बनवल्या आहेत. अनिक्षाने त्यांच्याकडे १० कोटी खंडणीची मागणी केली होती.

अनिक्षाने या क्लिप्स अमृता फडणवीसांना पाठवल्या आणि त्या डिलीट करण्याच्या बदल्यात १० कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांत धाव घेतली. पैसे दिले नाहीत, तर क्लिप व्हायरल करू अशी धमकी आपण अमृता फडणवीसांना दिल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.

या प्रकरणामध्ये काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. पुढील तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अनिक्षाची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिला २१ मार्चपर्यंतच कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT