Amruta Fadnavis  Amruta Fadnavis
महाराष्ट्र बातम्या

अमृता फडणवीसांचा राऊतांना सल्ला; ‘नागपुरात आल्यावर सावजी मटण खा’

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आणि विरोधकांमध्ये नेहमी वाकयुद्ध रंगत असते. एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी दोघे सोडत नाही. यात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) याही काही मागे नाही. त्या नेहमी कोणते ना कोणते वक्तव्य करून चर्चेत असतात. आता त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना धरून एक विधान केले आहे.

शिव संवाद दौऱ्याअंतर्गत शिवसेनेचे सर्व खासदार २२ ते २५ मार्चपर्यंत मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि जिल्हा परिषद गटापर्यंत पदाधिकाऱ्यांशी संवाद या साठीच हा धडक दौरा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आयोजिण्यात आला आहे. याअंतर्गद संजय राऊत (Sanjay Raut) हे नागपूरचा दौरा करणार आहेत.

‘नागपुरात आल्यावर सावजी मटण (mutton) नक्की खा’, अशी प्रतिक्रिया नागपूर दौऱ्यावर येणाऱ्या संजय राऊत यांना अमृता फडणवीस यांनी दिली. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. आज गिरीश महाजन यांच्या मुलीचे लग्न गाजत आहे, आणि मी त्याचा आनंद घेत आहे. मला काहीच महिती नाही काय घोळ सुरू आहे. मी तो माहिती करेल आणि नंतर बोलेल, अशाही अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. त्या कधी पत्रकारांशी बोलून तर कधी ट्विट करून लक्ष्य वेधून घेतात. तसेच संजय राऊतही नेहमी चर्चेत असतात. या दोघांमध्ये आधीही सामना रंगला आहे. आता अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना सावजी मटण खाण्याचा सल्ला दिल्यानंतर राऊत कोणती प्रतिक्रिया देतात हेच पाहणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT