महाराष्ट्र बातम्या

'बिल्लीने आज फिर....', राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर अमृतांचं खोचक ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी म्हटलंय की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, त्यांचा दबाव, एकतर तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. पुढे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या साऱ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका करणारं ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !

संजय राऊत यांनी आरोप करताना म्हटलंय की, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही या सरकारच्या वाटेतून बाजूला व्हा, तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा. जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईप करतील. त्यानुसार दिल्लीत सिद्धता झाली आहे. तुम्ही मदत केली नाही तर तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहेत. त्यांना सुद्धा टाईप करु, असं सांगण्यात आलं. त्यानंतर ईडीचे लोक पवार कुटुंबियांवर धाडी टाकू लागले. ईडी तर आहेच, त्याचबरोबर केंद्रीय पोलिस बल लावू, त्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्यावर आणि निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडायला लागल्या. मुलुंडचा दलाल (किरीट सोमय्या) सांगतो की आता संजय राऊतांवर धाडी पडत आहेत. तुमचं सरकार आलं नाही, म्हणून याप्रकारे सूड उगवत आहात आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही झुकू? हे शक्य नाही.

पुढे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असं करत म्हटलंय की त्यांनी आरोप केलाय की, कोरलाई गावात 19 बंगले बांधून ठेवले आहेत. माझं आव्हान आहे की, कधीही सांगा आपण चार बसेस करु आणि 19 बंगल्यांमध्ये पत्रकारांची पिकनीक काढू. जर बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन. जर दिसले नाहीत तर संपूर्ण शिवसेना जोड्याने मारेल. आपण ४ गाड्या करून त्या १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, पत्रकारांची पिकनिक काढू जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन , दिसले नाहीत तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी, चला दाखवू त्यांना...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT